अन् त्याच्यानंतर लगेचच घडणार्या घटनांमूळे तो चुकीचा असल्याचा सम़ज करून घेतो.
निर्णय चुकीचा आहे की बरोबर
हे काळावर मोजायचं की बुध्दीवर ?
बुध्दीच नसेल तर ३ तास दिले
तरी पेपर कसा सोडवणार ?
आपण सर्व गोष्टी वापरायला शिकतो ,
फक्त वेळ वापरायला शिकत नाही..
व.पु.काळे ( वपुर्झा )
खरोखर वेळ ही गोष्ट अशी आहे की तिला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माहिती आहे,
जितका तुमचा प्रश्न अवघड असेल तितका वेळ तुम्हाला द्यावा लागतो.
इथे प्रत्येकाला पटकन् उत्तर हवंय.
मग समोरच्याने लिहीलेलं उत्तर जसच्या तसं छापून मोकळं होणारे
हेही पहात नाहीत की त्या विध्यात्याने प्रत्येकासाठी वेगळा प्रश्न संच दिलाय.
मग काही उत्तरं चुकतात, आणि सुरू होतं comparison त्याच्यात आणि माझ्यात .

0 comments:
Post a Comment