आपण जेंव्हा कोणत्याही समस्येवर सल्ला देतो , तेंव्हा तो सल्ला हा मित्राला दिलेली
विचारांची एक दिशा असते. समोरील व्यक्ती त्यास सकारात्मक प्रतिसाद देईलच असे
काही नाही.
समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते.ही 'वपुं'ची वाक्यं आठवतात तेंव्हा ,मित्रांचे प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा त्यांना ते सोडवण्याची प्रेरणा देण्यातच हुशारी आहे, हे ध्यानात येतं.
त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने
पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये.
दुसर्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुध्दी वापरून त्या समस्येकडे बघू शकत नाही.तुम्ही तुमचाच तराजू वापरता.
व.पु. काळे ( ' महोत्सव ')

0 comments:
Post a Comment